डॉ. अमोल कोल्हे यांना राज्य युवा जनता दल (सेक्युलर) पक्षाचा जाहीर पाठिंबा..
शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांना महाराष्ट्र राज्य युवा जनता दल ( सेक्युलर) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे व पुणे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
सध्या देशातील लोकशाही सार्वभौमत्व, ऐक्य आणि सर्वधर्मसमभाव टिकवण्यासाठी मोदी व भाजप सरकारला सत्तेतून हटविणे ही निवडणुकीतील प्रार्थमिकता व देशाची गरज आहे. त्यादृष्टीने भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करतील अशा उमेदवारांना पाठिंबा देणे हे पक्षाने ठरविले आहे. त्यानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांना विजयी करण्याचे आवाहन जनता दल (सेक्युलर) पक्षाने मतदारसंघातील जनतेला केले आहे.