आमदार दिलीपराव वळसे यांचे स्वीय सहाय्यक काळुराम दांगट यांना बेदम मारहाण.
विधानसभेचे माजी अध्यक्ष व आंबेगांव तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसेपाटील यांचे स्वीय सहाय्यक काळुराम दांगट यांना सात आठ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. दांगट यांना सोडविण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नी व भाऊ यांना देखील मारहाण करण्यात आली. ही मारहाण राजकीय वादातून झाल्याचे समजते. दि, ३० एप्रिल रोजी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास मेंगडेवाडी येथे ही घटना घडली. दांगट यांना घराबाहेर बोलावून मारहाण करण्यात आली. दांगट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान दिलीपराव वळसे यांनी हा हल्ला शिवसेनेच्या लोकांनी केल्याचा आरोप केला आहे.